Wednesday, April 7, 2010

ऋणानुबंधाच्या गाठी गाणं

मिसळ-पाव या मराठी साइटवर "ऋणानुबंधाच्या गाठी" या गाण्यावरील हा धागा वाचला आणि आज खूप वर्षांनी हे गाणं ऐकण्यास मिळालं. मन एकदम उल्हासित झालं. माझ्या आठवणी-नुसार लहानपणी कधी-कधी रेडीओवर ऐकायला मिळायचं हे गाणं.

कुमार गंधर्वांनी म्हटलेलं हे अतिशय सुंदर गाणं. त्याचे बोल खालील-प्रमाणे,

ऋणानुबंधांच्या जिथून पडल्या गाठी
भेटीत तृष्टता मोठी || धृ||

त्या कातरवेळा थरथरती कधि अधरी
त्या तिन्हीसांजांच्या आठवणी त्या प्रहरी
कितिदा आलो, गेलो, रमलो
रुसण्यावाचुनि परस्परांच्या कधी न घडल्या गोष्टी

ऋणानुबंधांच्या जिथून पडल्या गाठी
भेटीत तृष्टता मोठी || धृ||

कधि तिने मनोरम रुसणे
रुसण्यात उगीच ते हसणे
म्हणून ते मनोहर रुसणे
हसणे, रुसणे, रुसणे, हसणे
हसण्यावरती रुसण्यासाठी, जन्मजन्मिच्या गाठी

ऋणानुबंधांच्या जिथून पडल्या गाठी
भेटीत तृष्टता मोठी || धृ||

कधि जवळ्‌ सुखाने बसलो
दुःखात सुखाला हसलो
कधि गहिवरलो, कधि धुसफुसलो
सागरतीरी आठवणींनी वाळूत मारल्या रेघा,
जन्मासाठी जन्म जन्मलो, जन्मात जमली ना गट्टी

ऋणानुबंधांच्या जिथून पडल्या गाठी
भेटीत तृष्टता मोठी || धृ||

हे गाणं येथे ऐकता येयील,


ऋणानुबंधाच्या गाठी

बोल आणि गाण्याची लिंक दिल्याबद्दल लेखकाचे आभार!

No comments: