Wednesday, April 7, 2010

ऋणानुबंधाच्या गाठी गाणं

मिसळ-पाव या मराठी साइटवर "ऋणानुबंधाच्या गाठी" या गाण्यावरील हा धागा वाचला आणि आज खूप वर्षांनी हे गाणं ऐकण्यास मिळालं. मन एकदम उल्हासित झालं. माझ्या आठवणी-नुसार लहानपणी कधी-कधी रेडीओवर ऐकायला मिळायचं हे गाणं.

कुमार गंधर्वांनी म्हटलेलं हे अतिशय सुंदर गाणं. त्याचे बोल खालील-प्रमाणे,

ऋणानुबंधांच्या जिथून पडल्या गाठी
भेटीत तृष्टता मोठी || धृ||

त्या कातरवेळा थरथरती कधि अधरी
त्या तिन्हीसांजांच्या आठवणी त्या प्रहरी
कितिदा आलो, गेलो, रमलो
रुसण्यावाचुनि परस्परांच्या कधी न घडल्या गोष्टी

ऋणानुबंधांच्या जिथून पडल्या गाठी
भेटीत तृष्टता मोठी || धृ||

कधि तिने मनोरम रुसणे
रुसण्यात उगीच ते हसणे
म्हणून ते मनोहर रुसणे
हसणे, रुसणे, रुसणे, हसणे
हसण्यावरती रुसण्यासाठी, जन्मजन्मिच्या गाठी

ऋणानुबंधांच्या जिथून पडल्या गाठी
भेटीत तृष्टता मोठी || धृ||

कधि जवळ्‌ सुखाने बसलो
दुःखात सुखाला हसलो
कधि गहिवरलो, कधि धुसफुसलो
सागरतीरी आठवणींनी वाळूत मारल्या रेघा,
जन्मासाठी जन्म जन्मलो, जन्मात जमली ना गट्टी

ऋणानुबंधांच्या जिथून पडल्या गाठी
भेटीत तृष्टता मोठी || धृ||

हे गाणं येथे ऐकता येयील,


ऋणानुबंधाच्या गाठी

बोल आणि गाण्याची लिंक दिल्याबद्दल लेखकाचे आभार!

Friday, March 19, 2010

मन कशात लागत नाही

मन कशात लागत नाही
अदमास कशाचा घ्यावा?
अज्ञात झर्‍यावर रात्री
मज ऐकू येतो पावा....

श्वासांचे तोडुन बंधन
हे हृदय फुलांचे होई
शिशिरात कसे झाडांचे
मग वैभव निघून जाई....

सळसळते पिंपळपान
वार्‍यात भुताची गाणी
भिंतीवर नक्षत्रांचे
आभाळ खचविले कोणी?

मन कशात लागत नाही...

मन बहरगुणांचे लोभी
समईवर पदर कशाला?
हे गीत तडकले जेथे
तो एकच दगड उशाला

चल जाऊ दूर कुठेही
हातात जरा दे हात
भर रस्त्यामध्ये माझा
होणार कधीतरी घात....

मन कशात लागत नाही..

- कवी ग्रेस

Tuesday, March 9, 2010

आई, असं का गं केलंस?

उरिया भाषेतील लेखक श्रीकांत परिजा यांनी एकदा एक हत्या झालेला स्त्री गर्भ पाहिला. त्या क्षणी त्यांच्या पोटात ढवळून आलं. काय करावं ते सुचेना. त्यानंतरचे कित्येक दिवस त्यांच्या मनातून ते दृश्‍य आणि त्या अकाली फेकून दिलेल्या चिमुकलीविषयीचे विचार पुसले जात नव्हते. मग त्यांनी लेखणी उचलली आणि त्या आईलाच एक पत्र लिहिलं... उरिया भाषेत प्रसिद्ध झालेल्या त्या पत्राचा अनुवाद केला आहे कटक येथे राहणाऱ्या राधा जोगळेकर यांनी.

का गं, तुला माझी थोडीशीही आठवण येत नाही का? तू असं का केलंस? मी तुला पाहण्यासाठी किती आशा लावून बसले होते; पण तू मला मारूनच टाकलंस. तुला माहिती आहे का आई, मी फक्त तुलाच ओळखत होते. आणखी कोणाचा स्पर्शही नव्हता झाला मला. माझ्या आयुष्यातल्या त्या चार महिन्यांत मी जे काही अनुभवलं, ते फक्त तुझ्याचमुळे गं. आई, तुला आठवतं का? माझा भाऊ राजा जेव्हा रडायचा, तेव्हा तू त्याला समजवायचीस, की रडू नकोस. आता थोड्याच दिवसांत तुझ्याशी खेळायला आणखी एक भाऊ येईल. तेव्हा मी तुझ्या पोटात खळखळून हसायचे आणि म्हणायचे, "आई, भाऊ नाही. राजाभाईची छोटी बहीण येणार आहे.'

तू राजाभाईला कुशीत घेऊन झोपी जायचीस; पण मला मात्र रात्रभर झोप यायची नाही. भाईबरोबर दंगामस्ती करण्याची, खेळण्याची मला खूप इच्छा व्हायची. मग पोटात असूनही मी त्याला हळूच पायानं ढकलून द्यायचे. तोही झोपेतून जागा झाल्यावर तुझ्या पोटाला हातानं ढकलत असे. मला लागायचं, तरीही खूप आनंद व्हायचा. का माहिती आहे? कारण बहीण-भावातल्या खेळाची मजा वेगळीच असते!

कधीतरी भाईला बरं नसायचं, तेव्हा तू म्हणायचीस, "हे मॉं, माझ्या मुलांना सुखी ठेव.' ते ऐकून माझ्या लहान लहान डोळ्यांत पाणी दाटून येई. वाटे, माझी आई किती चांगली आहे. मुलांवर तिची किती माया आहे. तुझ्यामुळे मला समजलं, की आणखी एक मोठी आई, "मॉं' आहे, जी माझ्या आईला शक्ती देते. सामर्थ्य देते.
माझे हे चार महिने फक्त तुझा विचार करण्यात गेले. मनात सतत एकच विचार असायचा, तुला बघण्याचा! एकदा तू राजाभाईला म्हणत होतीस, माझ्या बाळा, तुझ्यासाठी दहा महिने मी त्रास सोसल्यावर तुझा जन्म झाला.

मोठा झालास, की आईचं नाव उज्ज्वल कर, वगैरे वगैरे...
त्या दिवशी मला रडूच आलं. तू राजाभाईचे लाड करत होतीस म्हणून नाही, तर माझ्या आईला बघण्यासाठी मला अजून सहा महिने वाट बघावी लागेल म्हणून...
मग एके दिवशी तू आणि ते पप्पा नावाचे कोणीतरी डॉक्‍टरांकडे जाण्यासाठी बाहेर पडलात. रस्त्यामध्ये असताना मला खूप जोरात धक्का बसला. आतल्या आत बऱ्याच जागी मार बसला. मग तू पप्पांना गाडी हळूहळू चालवायला सांगितलंस. बाळाला त्रास होईल म्हणालीस. तुला माझी किती काळजी वाटते, हे पाहून मला किती बरं वाटलं होतं.

दवाखान्यात तू झोपलीस, तेव्हा मी तुझ्या पोटात खेळत होते. तुझ्या पोटावर काहीतरी लावून डॉक्‍टर जेव्हा तपासत होते, तेव्हा मला खोडसाळपणा करण्याची खूप इच्छा झाली होती. मी पोटातल्या पोटात पटापट फिरत राहिले. म्हणून डॉक्‍टर म्हणाले, ""मूल खूप हालचाल करत आहे. त्यामुळे काही समजत नाही.''
थोड्या वेळानं ते म्हणाले, की मुलगी आहे. त्यानंतर एकदम शांतता पसरली. मग तो पप्पा नावाचा माणूस म्हणाला, ""सर ऍबॉर्शन करा.''
डॉक्‍टर म्हणाले, ""उद्या सकाळी या.''
मी पोटामध्ये खिदळत होते.

दुसऱ्या दिवशी सकाळी देवाची पूजा करताना आई तू म्हणालीस, ""हे मॉं, मला नीटपणे जाऊन सुखरूपपणे घरी येऊ दे.''
मला वाटलं, की तुझी तब्येत बिघडली असावी. मी पण पाणावलेल्या डोळ्यांनी त्या मोठ्या आईला म्हणाले, की माझ्या आईला लवकर बरं कर...
नंतर... नंतरचं तुला माहीतच आहे...
आई, का गं मारलंस मला? आई, तुला बघायचं होतं गं डोळेभरून. मी तुला पाहिल्यानंतर मला मारून टाकलं असतंस तरी चाललं असतं मला. आई, मला पुन्हा एकदा तुझ्या गर्भात जागा दे. मला हे जग बघायचं आहे. मलाही शाळेत जायचं आहे. राजाभाईसारखा "हॅपी बर्थ डे' करायचा आहे. हसत, खिदळत तुझ्या मागे धावायचं आहे. आई, फक्त एकदाच मला कुशीत घेऊन माझे लाड कर ना गं... आणि फक्त एकदाच माझ्या कानाशी म्हण, "झोप गं माझ्या लाडक्‍या बाळा. तुझी आई आहे ना जवळ. मग कशाला घाबरतेस...'
आई, एकदाच... फक्त एकदाच...

Source:- http://72.78.249.107/esakal/20100307/5158787510458609398.htm

Thursday, March 4, 2010

जय देव जय देव जय तेंडुलकरा !

सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता आनंदाची !
अविस्मरणीय खेळी तुझी द्विशतकाची !
सर्वांगी सुंदर उधळण चौकारांची !
आकाशी झळके माळ उत्तुंग षटकारांची !

जय देव जय देव जय तेंडुलकरा !
तुझ्या चरणी माझा मानाचा मुजरा !
जय देव जय देव ..

१४७ चेंडू खेळपट्टी वरी उभा !
सर्व गोलंदाजांची दिसे दिव्य शोभा !
मदतीला कार्तिक पठाण धोनी आले गा !
धावांचा डोंगर उभा राहिला बघा !

जय देव जय देव जय तेंडुलकरा !
तुझ्या चरणी माझा मानाचा मुजरा !
जय देव जय देव ..

दुमदुमले मैदान झाला जल्लोष !
थरथरला गोलंदाज मानिला खेद !
कडाडली बॅट चेन्डुचा शिरच्छेद !
असामान्य अद्भुत शक्तिचा शोध !

जय देव जय देव जय तेंडुलकरा !
तुझ्या चरणी माझा मानाचा मुजरा !
जय देव जय देव..

घालीन लोटांगण वन्दिन चरणं !
डोळ्याने पाहिले द्विशतक तुझे !
पोस्टर लावूनि, आनंदे पुजिन !
भावे ओवाळीन, "सचिन" नामा !

त्वमेव ब्रॅडमन, बॉर्डर त्वमेव !
त्वमेव गावसकर, लारा त्वमेव !
त्वमेव फलंदाज, गोलंदाज त्वमेव !
त्वमेव क्षेत्ररक्षक, ऑलराउन्डर त्वमेव !

गुड लेन्थ टाकले, यॉर्कर टाकले !
बाउन्सर टाकले , व्यर्थ सारे !
ड्राइव्स तू मारले, पुल तू मारले !
फ्लिक्स तू मारले, सार्थ सारे !

हरे सचिन, हरे सचिन, सचिन सचिन हरे हरे
हरे तेंडुलकर, हरे तेंडुलकर, तेंडुलकर हरे हरे !!

Saturday, February 27, 2010

देवा मले पुन्हा शाळेत नेउन टाक

देवा मले पुन्हा शाळेत नेउन टाक.....!!,
डब्बा, वाटरबैग, पाटी अन दप्तर,
कम्पास, लेखन, पेन्सिल अन रब्बर..,,
गावचा फाटा, तिथून शालेची वाट,
देवा मले पुन्हा शाळेत नेउन टाक.....!!,

हातभर अंतर ठेउन प्रार्थनेची रांग,
लेझीम चा आवाज, 'झिंक ,'चाक,"झ्यांग",
विश्राम!, सावधान..!, उभा राय ताठ,
देवा मले पुन्हा शाळेत नेउन टाक.....!!,

जेवणाच्या सुट्टीत 'वाटना-वाटणी',
भाकरीच्या बदल्यात टमाटयाची चटनी,
जेवाच्या पहिले धुवा लागते हात,,
देवा मले पुन्हा शाळेत नेउन टाक.....!!,

बे एक बे, बे दुने चार,
गणिताच्या तासात, पोट्याइचा भागाकार,
किती खाल्ला मार, तरी पाढे नाही पाठ,,
देवा मले पुन्हा शाळेत नेउन टाक.....!!,

चिंचा, बोरं अन पोंगा-पंडित,
बर्फाचा गोला,'गोड लगे थंडित,
संत्र खावुन-खावुन आम्बटलेले दात,,
देवा मले पुन्हा शाळेत नेउन टाक.....!!,

मन लावून अभ्यास करीन,
पहिल्या बाकावर बसून, मास्तरच आइकिन,
पाढे पाठ करीन, रोज करीन गृहपाठ..,,
एकदा, फ़क्त एकदा, देवा शाळेत नेउन टाक,,,
मले शाळेत नेउन टाक,,,, ,,, ,, , . . !

Monday, February 22, 2010

आयुष्य हे असंच असतं...

आयुष्य हे असंच असतं...???
कधी कधी खुप आनन्द देतं
न मागताही सुख देतं,
पण अच्यानक हासता हासता रडवतं
आयुष्य...हे असंच असतं.????

आपण बरंच काही ठरवतो
आयुष्याचे आराखडे बांधतो
पण एका वळणांवर सगळ काही थांबतं
आयुष्य...हे असंच असतं.????

भुतकाळातल्या गोड आठवणी
वेड मन आठवत रहातं
पण त्या मनाला फ़सवुन रडवतं
आयुष्य...हे असंच असतं.????

सुखाबरोंबरच दु:खहीं देतं
कधीही भरुन न येणां-या
भळभळणां-या जखमाहीं देतं
आयुष्य...हे असंच असतं.????

आयुष्यात खुप काही मिळतं
त्यातल बरंच काही नको असतं
पण जे हवं असतं तेच मिळत नसतं
आयुष्य...हे असंच असतं.????