Saturday, February 27, 2010

देवा मले पुन्हा शाळेत नेउन टाक

देवा मले पुन्हा शाळेत नेउन टाक.....!!,
डब्बा, वाटरबैग, पाटी अन दप्तर,
कम्पास, लेखन, पेन्सिल अन रब्बर..,,
गावचा फाटा, तिथून शालेची वाट,
देवा मले पुन्हा शाळेत नेउन टाक.....!!,

हातभर अंतर ठेउन प्रार्थनेची रांग,
लेझीम चा आवाज, 'झिंक ,'चाक,"झ्यांग",
विश्राम!, सावधान..!, उभा राय ताठ,
देवा मले पुन्हा शाळेत नेउन टाक.....!!,

जेवणाच्या सुट्टीत 'वाटना-वाटणी',
भाकरीच्या बदल्यात टमाटयाची चटनी,
जेवाच्या पहिले धुवा लागते हात,,
देवा मले पुन्हा शाळेत नेउन टाक.....!!,

बे एक बे, बे दुने चार,
गणिताच्या तासात, पोट्याइचा भागाकार,
किती खाल्ला मार, तरी पाढे नाही पाठ,,
देवा मले पुन्हा शाळेत नेउन टाक.....!!,

चिंचा, बोरं अन पोंगा-पंडित,
बर्फाचा गोला,'गोड लगे थंडित,
संत्र खावुन-खावुन आम्बटलेले दात,,
देवा मले पुन्हा शाळेत नेउन टाक.....!!,

मन लावून अभ्यास करीन,
पहिल्या बाकावर बसून, मास्तरच आइकिन,
पाढे पाठ करीन, रोज करीन गृहपाठ..,,
एकदा, फ़क्त एकदा, देवा शाळेत नेउन टाक,,,
मले शाळेत नेउन टाक,,,, ,,, ,, , . . !

4 comments:

Ugich Konitari said...

आज खूप वर्षांनी गेलो मी गावी ,
वाटलं मुलांनी बाबांची शाळा बघावी
आठवणींची येई आता लाटेवर लाट
देवा, मला पुन्हा एकदा शाळेत नेउन टाक !

Chandrakant said...

@Ugich Konitari.
अरे वाह.. खूप छान !

pmahale said...

शुभेच्छा!

sanju kirwale said...

Khupach chan...