Wednesday, July 15, 2009

पुण्याची सवय झाली

पुण्याची सवय झाली

जे खरे ते लपवण्याची सवय झाली,
या तुझ्या शहरी, जिण्याची सवय झाली!

पुस्तके ना वाचली, ना वृत्तपत्रे
रोज 'पाट्या' वाचण्याची सवय झाली

हो! मलाही लागले पाणी पुण्याचे
काय सांगू? भांडण्याची सवय झाली

कीस शब्दांचाच नुसता पाडताना
मूळ मुद्दा चुकवण्याची सवय झाली

भांडल्याविन जात नाही दिवस माझा
वाटते आता पुण्याची सवय झाली

1 comment:

Ugich Konitari said...

परकर पोल्क्यात्ले पुणे,
काच्या मरून लंगडी खेळ्णारे पुणे
ऱस्ता ओलांडाय्ला वेळ लाग्तो म्हणून,
ड्राय्व्हर बस थाम्बवतो , ते पुणे,
सायकल वरून शाळेत जाताना साईड देणारे रिक्क्शावाले,
एक दोन वृत्तपत्रच अस्णरे पुणे,
ते माझे....

पर्वतिला गेल्यावर,
"आजींची नात आली" म्हणून
हातावर खोब्र्याचा प्रसाद आणि
साखरफुटाणे
देणारे पुणे,
आणि कॉलनीतला मुलगा
एस. एस. सी. ला पहिला आला,
म्हणून कॉलनीत्ल्याच धोब्यांनेच
पेढे वाट्ले ,
ते पुणे,
ते माझे....

हे अत्ताचे पुणे,
मी ओळ्खत नाही,
ते माझ्याबरोबर पुणे सोडून दूर गेले...
आता फक्त मनात असतं.....