Wednesday, December 10, 2008

जीवन असतं...

जीवन असतं फुलासारखं
फुलविता आलं पाहीजे


जीवन असतं झुल्यासारखं
झुलविता आलं पाहिजे


जीवन असतं मेघासारखं
भरून राहता आलं पाहिजे


जीवन असतं पावसासारखं
कोसळता आलं पाहिजे


जीवन असतं कापुरासारखं
सतत जळता आलं पाहिजे


जीवन असतं नदीसारखं
सतत वाहता आलं पाहिजे


जीवन असतं चंदनासारखं
स्वत: झिजता आलं पाहिजे


परंतु हे जीवन ज्यावर आहे
ते मन संयमात आणलं पाहिजे


- महेश मधुकर राऊत (म.टा. मध्ये प्रकाशित कविता ...)

No comments: