Saturday, February 27, 2010

देवा मले पुन्हा शाळेत नेउन टाक

देवा मले पुन्हा शाळेत नेउन टाक.....!!,
डब्बा, वाटरबैग, पाटी अन दप्तर,
कम्पास, लेखन, पेन्सिल अन रब्बर..,,
गावचा फाटा, तिथून शालेची वाट,
देवा मले पुन्हा शाळेत नेउन टाक.....!!,

हातभर अंतर ठेउन प्रार्थनेची रांग,
लेझीम चा आवाज, 'झिंक ,'चाक,"झ्यांग",
विश्राम!, सावधान..!, उभा राय ताठ,
देवा मले पुन्हा शाळेत नेउन टाक.....!!,

जेवणाच्या सुट्टीत 'वाटना-वाटणी',
भाकरीच्या बदल्यात टमाटयाची चटनी,
जेवाच्या पहिले धुवा लागते हात,,
देवा मले पुन्हा शाळेत नेउन टाक.....!!,

बे एक बे, बे दुने चार,
गणिताच्या तासात, पोट्याइचा भागाकार,
किती खाल्ला मार, तरी पाढे नाही पाठ,,
देवा मले पुन्हा शाळेत नेउन टाक.....!!,

चिंचा, बोरं अन पोंगा-पंडित,
बर्फाचा गोला,'गोड लगे थंडित,
संत्र खावुन-खावुन आम्बटलेले दात,,
देवा मले पुन्हा शाळेत नेउन टाक.....!!,

मन लावून अभ्यास करीन,
पहिल्या बाकावर बसून, मास्तरच आइकिन,
पाढे पाठ करीन, रोज करीन गृहपाठ..,,
एकदा, फ़क्त एकदा, देवा शाळेत नेउन टाक,,,
मले शाळेत नेउन टाक,,,, ,,, ,, , . . !

Monday, February 22, 2010

आयुष्य हे असंच असतं...

आयुष्य हे असंच असतं...???
कधी कधी खुप आनन्द देतं
न मागताही सुख देतं,
पण अच्यानक हासता हासता रडवतं
आयुष्य...हे असंच असतं.????

आपण बरंच काही ठरवतो
आयुष्याचे आराखडे बांधतो
पण एका वळणांवर सगळ काही थांबतं
आयुष्य...हे असंच असतं.????

भुतकाळातल्या गोड आठवणी
वेड मन आठवत रहातं
पण त्या मनाला फ़सवुन रडवतं
आयुष्य...हे असंच असतं.????

सुखाबरोंबरच दु:खहीं देतं
कधीही भरुन न येणां-या
भळभळणां-या जखमाहीं देतं
आयुष्य...हे असंच असतं.????

आयुष्यात खुप काही मिळतं
त्यातल बरंच काही नको असतं
पण जे हवं असतं तेच मिळत नसतं
आयुष्य...हे असंच असतं.????