वा-याने गंधांचे थवे फ़ुलले
पक्ष्यांची शाळा भरली
संध्याकाळ बासरीने गुणगुणली
मला ती येण्याची चाहूल लागली
पाणी बेभान थिरकले
डोंगर संधीप्रकाशाने उजळले
दिवसाची घालमेल थबकली
मला ती येण्याची चाहूल लागली
सृष्टी चैतन्यात चिमुकली झाली
अंबरात सांज ऊतू गेली
पायवाटांत ओढ भिरभिरली
मला ती येण्याची चाहूल लागली
मेघ रेशमी गारव्याच्या अंथरुणात उतरले
डोळे संध्येच्या पंखांनी झाकले
अरुणाने रात्रीला हाक दिली
मला ती येण्याची चाहूल लागली
पराग रिसबुड
Source - http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/3368585.cms
परिचित प्रवाहाविरोधातला ‘फ्लो’
3 weeks ago