एक पिस्तुलाची गोळी
अर्धा इंच लांब जेमतेम
तर पाऊण धरा
ते घोडा दाबणारं बोट
फक्त थोडं मागं घ्यायचं
असंच, फार तर पाव इंच
की निघालीच ती गोळी
मोठा आवाज करत, सुसाटत
भेदलाच तिने तो
छातीचा कृश पिंजरा
कोसळलंच ते
उपोषणं करून करून
झिजलेलं म्हातारं शरीर
आडवेच झाले
ते चालून चालून
थकलेले पाय
निमालं अखेर
अमानुष जातीय दंग्यांनी
विद्ध झालेलं मनही
वा रे वा,
त्या पिस्तुलाची कमाल
ती गोळी, अर्धा इंच जेमतेम
आणि ते घोडा दाबणारं
मानवी बोट
हे राम!
-अनिल अवचट, पुणे.
Source - http://beta.esakal.com/2009/01/29212251/bullet-and-gandhiji.html
परिचित प्रवाहाविरोधातला ‘फ्लो’
3 weeks ago